महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सदाशिवराव-पार्वतीबाईंच्या विवाह सोहळ्याची खास झलक, पाहा 'पानिपत'चं नवं गाणं - panipat songs

श्रेया घोषाल आणि अभय जोधपूरकर यांनी हे गाणं गायलं आहे. तर, अजय - अतुल यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा या गाण्यातून अनुभवायला मिळते. जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

Sapana ye sach hai song from panipat out
सदाशिवराव - पार्वतीबाईच्या विवाह सोहळ्याची खास झलक, पाहा 'पानिपत'चं नवं गाणं

By

Published : Dec 3, 2019, 8:14 AM IST

मुंबई -अभिनेता अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांची जोडी असलेल्या 'पानिपत' चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात सदाशिवराव आणि पार्वतीबाई यांच्या विवाहसोहळ्याची मराठमोळी झलक पाहायला मिळते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यामध्ये अर्जुन कपूर हा सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, क्रिती त्यांची पत्नी पार्वतीबाईची भूमिका साकारत आहे.

श्रेया घोषाल आणि अभय जोधपूरकर यांनी हे गाणं गायलं आहे. तर, अजय-अतुल यांच्या संगीताची जादु पुन्हा एकदा या गाण्यातून अनुभवायला मिळते. जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

अर्जुन आणि क्रितीने सोशल मीडियावर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. विविध कार्यक्रमांमध्येही 'पानिपत'ची टीम हजेरी लावत आहे. अभिनेता संजय दत्तचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगला व्यवसाय करेल, असा विश्वास या टीमने व्यक्त केला आहे.
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या बऱ्याच ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details