महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राची आणखी एका चित्रपटात वर्णी, शूटिंग सुरू - Sanya Malhotra's film

गणेश पूजा करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सान्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राची आणखी एका चित्रपटात वर्णी, शूटिंग सुरू

By

Published : Nov 19, 2019, 9:36 PM IST

मुंबई - 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरच 'शकुंतला देवी' या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटात सान्याची वर्णी लागली आहे. 'पगलैट' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. सान्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गणेश पूजा करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सान्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

सान्या मल्होत्रा
सान्या मल्होत्रा

हेही वाचा- 'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिदसोबत 'या' मराठी अभिनेत्रीची वर्णी


उमेश बिस्ट हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

'पगलैट' चित्रपटाची शूटिंग सुरू
सान्याने अलिकडेच 'शकुंतला देवी' या बायोपिकमधील तिचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुराग बासू यांच्याही एका चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अशी तगडी स्टारकास्ट भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी १३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- 'बागी ३'च्या सेटवरील टायगरची पहिली झलक, शेअर केला फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details