महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दंगल' चित्रपटाला ३ वर्ष पूर्ण, सान्या मल्होत्राने शेअर केली आठवण - 'दंगल' चित्रपटाला ३ वर्ष पूर्ण

आमिर खानसोबतचा फोटो पोस्ट करून सान्याने 'तीन वर्षापूर्वी या प्रवासाला सुरुवात झाली', असे कॅप्शन दिले आहे.

Sanya malhotra emotional post on dangal film as it turns 3 years
'दंगल' चित्रपटाला ३ वर्ष पूर्ण, सान्या मल्होत्राने शेअर केली आठवण

By

Published : Dec 23, 2019, 7:56 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने 'दंगल' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात कुस्तीपटु गीता आणि बबिता फोगट यांची कथा दाखवण्यात आली होती. सान्याने बबिताची भूमिका साकारली होती. तर, आमिर खान त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सान्याने सोशल मीडियावर 'दंगल' चित्रपटाच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

आमिर खानसोबतचा फोटो पोस्ट करून सान्याने 'तीन वर्षापूर्वी या प्रवासाला सुरुवात झाली', असे कॅप्शन दिले आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सान्याने 'दंगल' चित्रपटानंतर 'बधाई हो', 'पटाखा' 'फोटोग्राफ' यांसारख्या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या. आता ती 'शकुंतला देवी' या बायोपिकमध्ये विद्या बालनसोबत भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच ती 'पगलैट' चित्रपटातही झळकणार आहे.

हेही वाचा -भांगड्यानी होणार नववर्षाची सुरुवात, सनी कौशलच्या 'भांगडा पा ले'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details