मुंबई -मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहे. अभिनेत्री विद्या बालन यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विद्याने या चित्रपटाचे मोशन पोस्टरही शेअर केले होते. यामध्ये 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक शेअर करण्यात आला आहे.
सान्या मल्होत्रा या चित्रपटात अनुपमा बॅनर्जी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी तिचा एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. सान्यानेही सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.
'शकुंतला देवी' बायोपिकच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. अनु मेनन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.