मुंबई - अभिनेता संजय मिश्रा आणि दीपक डोबरियाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कामयाब' या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. येत्या ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत ४ मिलियनपेक्षा अधिक व्हिव्ज या ट्रेलरला मिळाले आहेत. आता या चित्रपटाचं नवं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये संजय मिश्रांचा अतरंगी थाट पाहायला मिळतो.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये त्यांचे विविध लुक दाखवण्यात आले आहेत.
हेही वाचा -'माझ्या नावाचा वापर करु नको', नेहा कक्कडने हिमांशला भरला सज्जड दम
ट्रेलरमध्येही त्यांच्या या भूमिकांची झलक पाहायला मिळाली. अनेक चढ उतार येऊनही संजय मिश्रा हार मानत नाही. यात त्याला साथ मिळते ती कास्टींग डायरेक्टर दीपिक डोबरियाल याची. या संपूर्ण प्रवासावर संजय मिश्रांचा एक डायलॉग चपखल बसतो. तो म्हणतो, 'जस्ट एन्जॉय लाइफ, और ऑप्शन भी क्या है?'
संजय मिश्रा आणि दीपिक डोबरियाल यांचे परफेक्ट कॉमेडी टायमिंग, इमोशन आणि ड्रामा याचे भरपूर सिक्वेन्स ट्रेलरमध्ये दिसतात. हार्दिक मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, शाहरुख खानच्या रेड चिलिज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हेही वाचा -ठरलं...अनन्या पांडेसोबत विजय देवराकोंडाची झळकणार जोडी