मुंबई -बॉलिवूडचा 'बाबा' म्हणजेच संजय दत्त याचा येत्या २९ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मान्यता त्याला खास सरप्राईझ देणार आहे. मात्र, संजूबाबादेखील त्याच्या चाहत्यांना एक खास भेट देणार आहे.
संजय दत्तच्या निर्मिती अंतर्गत दाक्षिणात्य चित्रपट 'प्रस्थानम' याचा हिंदी रिमेक तयार होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता या चित्रपटाचा टीजर लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या वाढदिवशीच हा टीजर संजय दत्त त्याच्या चाहत्यांशी शेअर करणार आहे. तसेच, या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित केला जाईल.
'प्रस्थानम' असेच हिंदी रिमेकचे नाव असणार आहे. यामध्ये मनिषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तुर आणि सत्यजीत दुबे हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.