मुंबई - दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांचा मुलगा संजय दत्तने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये संजय दत्त वडिलांच्या जवळ उभा असलेला दिसत आहे.
संजय दत्तने फोटो शेअर करून दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा - सुनील दत्त आणि संजय दत्त फोटो
दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची आज 91वी जयंती आहे. या निमित्त त्यांचा मुलगा संजय दत्तने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर केला आहे. 'तुम्ही कायम माझ्यासाठी शक्ती आणि आनंदाचा स्रोत राहिले आहात. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा' असे कॅप्शन देत संजय दत्तने फोटो शेअर केला आहे.
'तुम्ही कायम माझ्यासाठी शक्ती आणि आनंदाचा स्रोत राहिले आहात. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा' असे कॅप्शन देत संजय दत्तने फोटो शेअर केला आहे. संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त हिने देखील आजोबा सुनील दत्त यांना नमन केले आहे. सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा दिला आहे.
२५ मे २००५ ला अभिनेता सुनील दत्त यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हमराज, रेश्मा और शेरा, गुमराह, मेरा साया, मदर इंडिया, वक्त, पडोसन, साधना या चित्रपटांतील भूमिकांसाठी दत्त यांना ओळखले जाते.