मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तने कॅन्सरशी केलेल्या सामन्याची आठवण सांगितली. डॉक्टरांनी त्याला जगण्याचे ५० - ५० टक्के चान्स असल्याची कल्पना त्याला दिली होती. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्यामुळेच या जीवघेण्या आजाराशी तो झुंजू शकला, असे तो म्हणाला.
जागतिक कर्करोग दिन २०२१ रोजी संजय दत्तने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये चौथ्या स्टेजवर असलेल्या कॅन्सरशी कसा मुकाबला केला त्याचा अनुभव सांगितला.
"जेव्हा ही बातमी ब्रेक झाली तेव्हा माझ्या मनात खूप राग आला होता आणि मीच का याचे मला आश्चर्य वाटले होते. अशावेळी उपचार काय करावेत हे ठरवण्यासाठी लोक भरपूर वेळ घेतात. परंतु मी लगेचच निर्णय घेतला कारण माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. तेव्हा मी या आजाराचा स्वीकार केला आणि मी विचार केला की कॅन्सर काहीही असो आपण त्याचा मुकाबला करायचा. जेव्हा मी डॉ. शेवंती लिमये यांना भेटलो तेव्हा माझ्या मनात हा विचार पक्का झाला होता.", असे संजय दत्त म्हणाला.