मुंबई - मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केलेल्या संजय दत्तचा पहिलाच 'बाबा' चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. या चित्रपटाची 'गोल्डन ग्लोब २०२०' साठी विदेशी भाषा या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.
'बाबा' चित्रपटाची 'गोल्डन ग्लोब'साठी निवड, संजय दत्तने शेअर केली पोस्ट
'भावनेला भाषा नसते', अशी दमदार टॅगलाईन असलेल्या 'बाबा' चित्रपटातून वडील आणि मुलाचे अबोल नाते उलगडण्यात आले आहे. आपल्या मुलासाठी संघर्ष करणारा 'बाबा' या चित्रपटात पाहायला मिळतो.

अभिनेता दीपक दोबरियाल, नंदीता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
संजय दत्तच्या निर्मितीअंतर्गत तयार झालेला पहिलाच चित्रपट गोल्डन ग्लोबमध्ये झळकल्यामुळे त्याने ट्विटरवर आभार व्यक्त केले आहेत.