वाळवंटात वसलेल्या सात छोट्या छोट्या देशांनी एकत्र येउन ‘युएई’ स्थापन केला आणि या तेल-श्रीमंत प्रभागाने जागतिक बाजारपेठ आपल्याकडे आकर्षित केली. यात दुबई सुद्धा मोडतो आणि अनेक फिल्मस्टार्सची दुबईमध्ये आलिशान घरे आहेत. संजय दत्तचे सुद्धा दुबई मध्ये मोठाले घर असून गेल्या लॉकडाऊन काळात जागतिक विमानसेवा बंद असल्यामुळे त्याची पत्नी आणि मुले दुबईत अडकून पडले होते. पूर्वी तिथे ‘रेसिडेंट व्हिसा’ मिळत नसे परंतु आता तोही आता अराबांव्यतिरिक्तही मिळू लागलाय ज्याला ‘गोल्डन व्हिसा’ म्हणतात. या गोल्डन व्हिसाचा नवीनतम मानकरी आहे संजय दत्त.
संजय दत्तला संयुक्त अरब अमारतीचा ‘गोल्डन व्हिसा’ ‘रॉकी’ या त्याच्या पहिल्या चित्रपटापासून संजय दत्तचा बॉलिवूडमध्ये प्रभाव पडला आणि आता चार दशकांनंतर तो भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार मानला जातो. त्याचा स्टारडम केवळ आपल्या राष्ट्राच्या सीमेपुरता मर्यादित नाही तर जगभर पसरला आहे. खलनायक, साजन, वास्तव, मुन्नाभाई एमबीबीएस आणि इतर असंख्य चित्रपटांसह त्यांनी स्वत: ला ग्लोबल आयकॉन म्हणून स्थापित केले आहे. आता संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीकडून एक सन्मान देण्यात आला आहे. तो हा पहिला भारतीय अभिनेता बनला आहे ज्याला गोल्डन व्हिसा प्रदान करण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील बॉलिवूडचा मोठा प्रभाव आणि संजय दत्तवरील अफाट प्रेम आणि निष्ठा असणारी त्याची फॅनमंडळी यामुळेच त्याला हा फायदा झाला असावा. २०१९ पासून, यूएई स्थानिक प्रायोजकांची आवश्यकता न बाळगता परदेशी लोकांना काम करण्यासाठी, नोकरीसाठी, अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी गोल्डन व्हिसा देत आहे. त्यांचा हा पुढाकार परदेशी गुंतवणूक आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या मालकांना आकर्षित करण्यासाठी आहे. हा सन्मान मिळाल्यावर संजय दत्त म्हणाला की, "गोल्डन व्हिसा हा प्रतिष्ठित व्हिसा मिळणे हा माझा सन्मान आहे. गेल्या वर्षी दुबई माझ्या कुटुंबाचे घर बनले होते आणि त्यासाठी युएई सरकारच्या त्यांच्या कायम सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यांचा ‘गोल्डन व्हिसा’ उपक्रम खरोखरच दूरदर्शी आहे, यामुळे गुंतवणूकदार-अनुकूल देश म्हणून विकसित होण्यास मदत झाली आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ते असेच चालू राहील. मी देखील वचन देतो की जेव्हा जेव्हा या देशाला गरज पडेल तेव्हा तेव्हा मी मदत करण्यास तत्पर असेन. हीच खरी माणुसकी आहे.”संजय दत्तने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्सवर लिहिले की, ''मेजर जनरल मोहम्मद अल मेरी यांच्या उपस्थितीत युएईसाठी गोल्डन व्हिसा मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान आहे. या सन्माबद्दल मी त्याचे आभार मानतो. तसेच @ फ्लायदुबाईचे सीओओ हमाद ओबैदल्ला यांचेही पाठिंबा दिल्यबद्दल आभार मानतो."नजीकच्या काळात, संजय दत्तचे, भुज: द प्राइड ऑफ इंडिया, केजीएफ : चॅप्टर २, पृथ्वीराज आणि शमशेरा सारखे आगामी सिनेमा येत आहेत.