मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच आगामी 'प्रस्थानम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिजर आणि संजय दत्तचा फर्स्ट लूक असलेले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या चित्रपटातील मनिषा कोइराला, जॅकी श्रॉफ, अली फजल, सत्यजीत दुबे आणि संजय दत्त यांचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
'प्रस्थानम' नवे दमदार पोस्टर लॉन्च - Amyra Dastur
'प्रस्थानम' या चित्रपटातील मनिषा कोइराला, जॅकी श्रॉफ, अली फजल, सत्यजीत दुबे आणि संजय दत्त यांचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
प्रस्थानमचे नवे पोस्टर
देवा कट्टा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, संजय दत्तच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात संजय दत्त हा 'बलदेव प्रताप सिंग' ही भूमिका साकारत आहे.
यह गद्दी विरासत से नही काबिलियत से मिलती है', अशी दमदार टॅगलाईन या चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.