महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मैत्रीसाठी जीव देणारा आणि घेणारा संग्राम दिसणार 'विक्की वेलिंगकर' सिनेमात - Sangram Samel latest news

अभिनेता संग्राम समेळ 'विक्की वेलिंगकर' या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो एका हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

विक्की वेलिंगकर

By

Published : Oct 29, 2019, 5:51 PM IST

आजवर अनेक मालिका आणि नाटकांमध्ये दिसलेला चेहरा संग्राम समेळ आता 'विक्की वेलिंगकर' या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो एका हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

त्याच्या भूमिकेचा लूक रिव्हील करणारे एक पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून त्याच्यावर 'मैत्रीसाठी जीव देणं किंवा घेणे सारखेच असते' असं लिहिण्यात आले आहे. या सिनेमात त्याची भूमिका नक्की कशाप्रकारे गुंफण्यात आली आहे? याबद्दल उत्सुकता कायम आहे. मात्र, सिनेमातल्या सस्पेन्स आणि थ्रिल याला एक वेगळा ट्विस्ट देणार असल्याचे हे पोस्टर पाहून तरी नक्कीच वाटतंय.

विकी वेलिंगकर या सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच एका मास्क मेन्स पोस्टरही रिलीज करण्यात आला होता. या मास्क मॅनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, त्याच दरम्यान आता संग्रामचं हे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जे ती रिलीज करताना सोशल मीडियावर 'पुरोहित की हॅकर अजब याचे फंडे, नाव याचं तात्या पिकाचू की विकी लोखंडे?' अशी पोस्टही टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हा विक्की लोखंडे नक्की या सिनेमात काय धम्माल करतो? सिनेमाचं ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळेल. हा सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details