मराठी चित्रपटाचे गुणवंत दिग्दर्शक समीर विद्वन्स यांच्या आगामी धुरळा चित्रपटाची हवा जोरदार तापली आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच ताणली आहे.
पाहा, समीर विद्वन्सच्या मल्टी स्टारर राजकीय नाट्याचा 'धुरळा' - 'Dhurala' teaser release
आगामी धुरळा चित्रपटाची हवा जोरदार तापली आहे. आता या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच ताणली आहे.
राजकीय नाट्याचा 'धुरळा'
या चित्रपटात मराठी कलाकारांची फौजच पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरी, अमेय वाघ, उमेश कामत, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अलका कुबल अशी तगडी स्टारकास्ट टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.
'धुरळा' चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांना चकित केले आहे. हा सिनेमा ३ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
TAGGED:
'Dhurala' teaser release