मुंबई -बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सलमान खानने या चित्रपटातील २ गाणी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहेत. आता या चित्रपटाची थिम असलेलं पॉवर पॅक गाणं 'हुड हुड दबंग' हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'हुड हुड दबंग आधी ऐकवलं आता दाखवणार आहे. विश्वास आहे की तुम्ही स्वागत नक्की करणार', असं कॅप्शन देऊन त्याने या गाण्याची झलक शेअर केली आहे.