मुंबई -बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'मलाल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटात दोन नवे चेहरे झळकणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या बहीणीची मुलगी शर्मिन सेहगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी हे दोघे या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शर्मिन आणि मिजानला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सलमान खानने दिलेल्या शुभेच्छा खास ठरल्या आहेत.
संजय लीला भन्साळींच्या 'मलाल'साठी भाईजानच्या खास शुभेच्छा - bollywood
संजय लीला भन्साळी यांच्या बहीणीची मुलगी शर्मिन सेहगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी हे दोघे या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शर्मिन आणि मिजानला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सलमान खानने दिलेल्या शुभेच्छा खास ठरल्या आहेत.

सलमानच्या शुभेच्छा खास ठरण्यामागे कारणही तसेच विशेष आहे. सलमानने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शर्मिनचा बालपणीचा फोटो पाहायला मिळतोय. हा फोटो 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवरचा आहे. या सेटवरच्या एका सीनदरम्यान शर्मिन देखील संजय लीला भन्साळीसोबत आली होती. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.
१९९९ मध्ये सलमान खानने संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तब्बल २० वर्षांनंतर हे दोघेही पुन्हा एकत्र येणार आहेत. संजय लीला भन्साळींच्या आगामी 'इंन्शाल्ला' या चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.