मुंबई -हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता मराठी चित्रपटांचेही हिंदी रिमेक होण्यास सुरुवात झाली आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे यांनी आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा २०१८ साली 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटाचा हिंदी रिमेक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट शेतकऱ्यांवर आधारित होता. यामध्ये अभिनेता ओम भूतकरची मुख्य भूमिका होती. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये आयुष शर्माची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या हिंदी रिमेकची घोषणा मागच्याच वर्षी करण्यात आली आहे.
हेही वाचा -'कभी ईद कभी दिवाली'मध्ये भाईजानसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी