मुंबई -बॉलिवूडमध्ये 'भाईजान' नावाचा दबदबा असलेल्या सलमान खानचा 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतेच या चित्रपटातले 'जिंदा हु मै' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या लाँचिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांची मजेदार बॉन्डिंग पाहायला मिळाली.
'भारत' चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कॅटरिनाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. सलमानचे चाहते त्याला नेहमी 'भाईजान' या नावाने हाक मारतात. त्यामुळे गाण्याच्या लाँचिंग दरम्यान एका पत्रकाराने कॅटरिनाला 'भाईजान' सोबत काम करताना कसा अनुभव आला, असा प्रश्न विचारला. यावर सलमान मध्येच माईक हातात घेऊन म्हणाला, की 'मी तुमचा 'भाईजान' आहे. कॅटरिनाचा नाही'. यावर कॅटरिनाने हसून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सलमान खानला प्रश्न विचारण्यात आला, की कॅटरिनाने तुला कोणत्या नावाने बोलवावे असे तुला वाटते? यावर सलमानने 'मेरी जान' असे उत्तर दिले.