मुंबई - सलमान खानचा पाच वर्षापूर्वी ईदला प्रदर्शित झालेला किक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. साजिद नाडियादवाला यांचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट होता. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर करीत या बातमीला दुजोरा दिलाय.
किक चित्रपटात सलमान खानने साकारलेल्या अदभूत आणि थक्क करणाऱ्या स्टंटची झलक पाहायला मिळाली होती. सुपरहिरोप्रमाणे चेहऱ्यावर मास्क धारण करून खलनायकांशी दोन हात करत त्यांना चकवा देणारा सलमान खान प्रेक्षकांना भावला होता. जॅकलिन फर्नांडिसची, इथे जॅकलिन आणि सलमानच्या रोमान्सबरोबर नृत्य, हाणामारीची दृष्ये, विनोदी आणि खुसखुशीत संवादांची अनुभूती किकने दिली होती.