मुंबई -सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे विविध पोस्टर आणि मोशन पोस्टरनंतर चाहत्यांना या ट्रेलरची उत्सुकता होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्याबरोबर ट्रेलरवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे.
पाहा 'भारत'चा अनोखा प्रवास, ट्रेलर प्रदर्शित - sunil grover
'भारत' चित्रपटात सलमान खानच्या विविध पाच भूमिका पाहायला मिळणार आहेत. लहानपणापासून तर अगदी वृद्ध होईपर्यंत त्याच्या आयुष्यात कशाप्रकारे वळणं येतात. कठिण परिस्थितीलाही तो कसा सामोरे जातो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'भारत'च्या ट्रेलरमध्ये दिशा पटाणीचीही दमदार झलक पाहायला मिळत आहे. कॅटरिना देखील कुरुळ्या केसांमध्ये चाहत्यांवर भूरळ पाडते. सुनिल ग्रोव्हर हा 'भारत' म्हणजेच सलमान खानच्या मित्राची भूमिका साकारत आहे. जॅकी श्रॉफ हे वडिलांची भूमिका साकारत आहेत.
दिग्दर्शक अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'ईद'च्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.