महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दबंग ३' चित्रपटातील सलमान खानसोबत सईची पहिली झलक - दबंग ३

सईचा हा पदापर्णीय चित्रपट आहे. यामध्ये ती सलमानची पुर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पदार्पणाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, तिचा कोणताही फोटो समोर आला नव्हता.

'दबंग ३' चित्रपटातील सलमान खानसोबत सईची पहिली झलक

By

Published : Sep 22, 2019, 5:24 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'दबंग ३' चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबतच महेश मांजरेकर यांची मुलगी सई ही देखील झळकणार आहे. अलिकडेच झालेल्या आयफा अवार्ड्स सोहळ्यात सलमानने सईची ओळख करुन दिली. त्यांचे बरेच फोटोही व्हायरल झाले. आता 'दबंग ३' चित्रपटातील तिची आणि सलमानची पहिली झलकही समोर आली आहे. सलमान खानने तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'सई'चा हा पदापर्णीय चित्रपट आहे. यामध्ये ती सलमानची पुर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पदार्पणाच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या. मात्र, तिचा कोणताही फोटो समोर आला नव्हता. 'आयफा' पुरस्कार सोहळ्यानंतर सईची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

महेश मांजरेकरांनी 'दबंग' चित्रपटात भूमिका साकारली होती. आता 'दबंग ३'मध्ये त्यांची मुलगी भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सलमान आणि सईची केमेस्ट्री कशी असेल, याची चाहत्यांना आतुरता आहे.

हेही वाचा- IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा

प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर, अरबाज खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप देखील यामध्ये विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. डिसेंबर महिन्यात २० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा- 'एमी अवार्ड्स २०१९': 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज'ला मिळालं नॉमिनेशन

ABOUT THE AUTHOR

...view details