महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'चुलबुल पांडे' विरुद्ध 'बाली सिंग', 'दबंग ३' मध्ये होणार तगडी टक्कर

सलमान खानची जबरदस्त अ‌ॅक्शन या सिनमध्ये पाहायला मिळते. तर, किचा सुदीपही तेवढीच तगडी टक्कर देताना दिसतो. अशी अ‌ॅक्शन यापूर्वी सलमानच्या कोणत्याही चित्रपटात यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती.

By

Published : Dec 12, 2019, 9:49 AM IST

Salman Khan share promotional video of villain of Dabangg 3
'चुलबुल पांडे' विरुद्ध 'बाली सिंग', 'दबंग ३' मध्ये होणार तगडी टक्कर

मुंबई - सलमानचा बहुप्रतीक्षित 'दबंग ३' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये सलमान आणि खलनायक असलेल्या किचा सुदिप यांच्यात जोरदार हाणामारी होणार आहे. विशेष म्हणजे सलमान एकटा असेल आणि सुदिपसोबत ५०० जणांची फलटण असेल. सलमानने या फाईट सिनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सलमान खानची जबरदस्त अ‌ॅक्शन या सिनमध्ये पाहायला मिळते. तर, किचा सुदीपही तेवढीच तगडी टक्कर देताना दिसतो. अशी अ‌ॅक्शन यापूर्वी सलमानच्या कोणत्याही चित्रपटात यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती. या सीन्समध्ये शेकडो गाड्या वापरण्यात आल्या आहेत, असे सिनेमाशी संबंधित व्यक्तीने सांगितले.

हेही वाचा -'जयेशभाई जोरदार' चित्रपटात रणवीरसोबत 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी

'दबंग ३' चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, अमोल गुप्ते, माही गिल आणि टीनू आनंद यांच्या भूमिक आहेत. प्रिती झिंटा हिची यात एक छोटी झलक असून महेश मांजरेकरांची मुलगी सई महत्त्वाची भूमिकेत आहे.

'दबंग ३' येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती

ABOUT THE AUTHOR

...view details