मुंबई -सलमान खान-कॅटरिना कैफ यांच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. त्याच्या 'भारत' चित्रपटातने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस गाजवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींची धमाकेदार ओपनिंग करुन हा चित्रपट यावर्षीचा सर्वात मोठा ओपनर बनला आहे. तिसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
सलमान-कॅटची जादू कायम, तिसऱ्या दिवशीही 'भारत'ची दणक्यात कमाई - disha patani
'भारत' चित्रपट ४७०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला. तर सलमान आणि कॅटरिनाच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
'भारत' चित्रपट ४७०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला. तर सलमान आणि कॅटरिनाच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २२.२० कोटींची कमाई करत १०० कोटींकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई ९५.५० कोटीपर्यंत मजल मारली आहे.
'भारत' चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून सलमान खाननेही चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट १०० कोटीचा आकडा पार करेल, यात शंका नाही.