मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत महेश मांजरेकर यांची मुलगी सई ही देखील मुख्य भूमिकेत आहे. आयफा अवार्ड्स सोहळ्यात सलमानने तिची सर्वांना ओळख करुन दिली. त्यानंतरही सईने सलमानसोबत इतरही कार्यक्रमात हजेरी लावली. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सईच्या फोटोसमोर उभं राहुन भाईजान तिच्या आनंदासाठी काहीही करण्यासाठी तयार असल्याचं म्हणत आहे.
सई 'दबंग ३'मध्ये चुलबुल पांडेची प्रेयसी 'खुषी'ची भूमिका साकारत आहे. तर, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटातही चुलबुल पांडेची पत्नी 'रज्जो'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा -'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर