मुंबई -बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान कधी काय करेल याचा काहीही नेम नाही. सध्या तो त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सेटवरुन तो नेहमी नवनविण व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आताही त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो स्वत:लाच पोतराजच्या चाबकाने फटके मारताना दिसतो.
सलमान खान इतरांप्रती खूपच हळवा असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या 'दबंग ३'च्या सेटवर अलिकडेच काही पोतराजांनी हजेरी लावली होती. त्यांनी सलमानसोबत गप्पा देखील मारल्या.
पोतराज त्यांच्या अंगावर नेहमी चाबकाने फटके मारताना दिसतात. यावेळी सलमाननेही हा प्रकार स्वत:वर अनुभवला. 'त्यांचा त्रास वाटुन घेण्यातही एक वेगळाच आनंद आहे', असे सलमानने या व्हिडिओवर कॅप्शन दिले आहे. तसेच लहान मुलांनी असं करून पाहू नये, असंही म्हटलं आहे.