मुंबई -बॉलिवूडमध्ये सलमान खानला 'दबंग' या नावाने ओळखले जाते. त्याचा 'दबंग ३' हा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र, 'दबंग'चा नेमका अर्थ काय, हे खुद्द सलमाननेच एका व्हिडिओतून सांगितले आहे. आज जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधुन भाईजानने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा -'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिदसोबत 'या' मराठी अभिनेत्रीची वर्णी
सलमान खान या व्हिडिओत 'दबंग' शब्दाचा अर्थ हिंमत, तडफदार, नाटकी असा सांगतो. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खानही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. तुमच्या आयुष्यात असा कोणी 'दबंग' असेल, तर आम्हाला कळवा. अशा 'दबंग' व्यक्तीला 'दबंग ३'च्या टीमकडून 'बॅज ऑफ ऑनर' देण्यात येणार असल्याचंही या व्हिडिओतून त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -'बेईंग स्ट्राँग' म्हणत सलमान खानने दिले फिटनेसचे धडे
या व्हिडिओद्वारे सलमान खान त्याच्या 'दबंग ३' चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोनाक्षी सिन्हासोबतच सई मांजरेकरची भूमिका देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.