मुंबई - सलमान खान बॉलिवूडमधील दबंग कलाकार आहे. याचा प्रत्यय त्याने शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवरून दिसून येतो. 'दबंग ३' चे शूटींग सुरू असतानाच तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. अलिकडे त्याने प्रभुदेवासोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय तो व्हायरल झालाय.
'उर्वशी' गाण्यावर असा थिरकला सलमान, प्रभुदेवाही झाला दंग - Urvashi song
सलमान खानचा डान्स करीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रभुदेवासोबत डान्स स्टेप शिकतानाचा हा व्हिडिओ असून यात सलमान, प्रभुदेवा, सुदिप आणि वरदा खान नाडियावाला 'उर्वशी' या गाण्यावर डान्स करीत आहेत.
या व्हिडिओमध्ये सलमान खान प्रभुदेवाकडून डान्स स्टेप शिकत आहे. या व्हिडिओत दाक्षिणात्य स्टार के. सुदिप दिसत आहे. सलमानने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान, प्रभुदेवा, सुदिप आणि वरदा खान नाडियावाला 'उर्वशी' या गाण्यावर डान्स करीत आहेत. यात ते प्रभुदेवाच्या स्टेप्स फॉलो करीत असून खूप मस्ती करीत आहेत.
'दबंग ३' या चित्रपटाचे शूटींग सुरू असून याचे दिग्दर्शन प्रभुदेवा करीत आहेत. यात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत झळकणार आहे.