महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भरपावसात भाईजानची सायकलस्वारी, व्हिडिओ व्हायरल - mumbai rain updates

'दबंग ३' चे नुकतेच जयपूर येथील शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे सलमान खान सध्या मुंबईत परतला आहे. या चित्रपटाचं काही शूटिंग हे मुंबईत होणार असल्यामुळे शूटिंग लोकेशनपर्यंत सलमान खान सायकलवरच पोहोचला होता.

मुंबईच्या भर पावसात भाईजानची सायकलस्वारी, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Sep 7, 2019, 10:01 AM IST

मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र, मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात सलमाननेही सायकलस्वारी करत शूटिंगचे लोकेशन गाठले. यावेळी रस्त्यावरील लोकांनाही सलमानसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. भाईजाननेही त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन सायकलस्वारीचा आनंद लूटला.

'दबंग ३' चे नुकतेच जयपूर येथील शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे सलमान खान सध्या मुंबईत परतला आहे. या चित्रपटाचं काही शूटिंग हे मुंबईत होणार असल्यामुळे शूटिंग लोकेशनपर्यंत सलमान खान सायकलवरच पोहोचला होता.

त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओवरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details