मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि संजय लीला भन्साळी हे 'ईन्शाल्ला' चित्रपटासाठी एकत्र येणार होते. सलमानने या चित्रपटाबाबत त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देखील दिली होती. मात्र, आता भाईजानने या चित्रपटातून माघार घेतली असल्याचं स्पष्ट केलं आहे.
'ईन्शाल्ला' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भट्ट भूमिका साकारणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सलमानने दिली होती. त्यानंतर आता त्याने या चित्रपटातून माघार घेतली आहे.
'आयफा अवार्डस २०१९' या पुरस्कार सोहळ्यात सलमानने याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्याने महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिच्यासोबत हजेरी लावली होती.
यावेळी त्याने माध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. 'आता 'ईन्शाल्ला' चित्रपट सध्या थांबला आहे. त्याचं शूटिंग होईल. मात्र, हा चित्रपट माझ्याशिवाय तयार होईल', असे तो यावेळी म्हणाला.