मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं बॉलिवूडमध्ये एक वेगळं प्रस्थ पाहायला मिळतं. आजवर त्याने बरेच सुपरडुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याची लोकप्रियताही अफाट आहे. बॉलिवूडमध्ये सलमानने तब्बल ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर एका रात्रीत तो स्टार झाला. त्याने बऱ्याच कौटुंबिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याचे वेगळे स्थान आहे.