मुंबई -छोट्या पडद्यावर सध्या 'बिग बॉस'च्या १३ व्या पर्वात सदस्यांची तगडी चुरस पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप आणि कुरघोडी करण्यात हे सदस्य कुठेही कमी पडत नाहीत. या आठवड्यात शहनाज गिलला कॅप्टनचे पद मिळाल्यानंतर इतर सदस्य तिच्यावर राग काढण्यासाठी घरातील कोणतेच काम करत नाहीयेत. त्यामुळे 'बिग बॉस'चे सुत्रसंचालन करणाऱ्या सलमान खानवरच घराची साफसफाई करण्याची वेळ आली.
'बिग बॉस'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान स्वत: घरातील भांडी आणि टॉयलेट देखील साफ करताना दिसतो. घरातील स्पर्धकांसमोर सलमानवर ही वेळ आल्याने नेटकऱ्यांनी देखील स्पर्धकांना खडे बोल सुनावले आहेत.