महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दंबग ३'च्या सेटवर लहान मुलांसोबत सलमान-सोनाक्षीची धमाल, फोटो शेअर - सोनाक्षी सिन्हा

सलमान खानचे लहान मुलांवरील प्रेम सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळेच 'दबंग ३'च्या सेटवर काही लहान गतीमंद मुलांसोबत त्याने वेळ घालवला.

'दंबग ३'च्या सेटवर लहान मुलांसोबत सलमान-सोनाक्षीची धमाल, फोटो शेअर

By

Published : Aug 22, 2019, 10:52 AM IST


मुंबई -सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा लवकरच 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. सेटवरील वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सलमान आणि सोनाक्षीने चित्रीकरणादरम्यान लहाण मुलांबरोबर वेळही घालवला. त्याचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान खानचे लहान मुलांवरील प्रेम सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळेच 'दबंग ३'च्या सेटवर काही लहान गतीमंद मुलांसोबत त्याने वेळ घालवला. त्यांच्यासोबत डान्सही केला. या मुलांना पाहुन सलमान यावेळी भावुक झालेलाही पाहायला मिळाला. सोनाक्षीनेही मुलांसोबत गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत फोटो काढले.

'दंबग ३'च्या सेटवर लहान मुलांसोबत सलमान-सोनाक्षीची धमाल, फोटो शेअर

'दबंग ३' चित्रपट हा २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details