मुंबई -संगीतकार सलील कुलकर्णी यांनी 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटातून दिग्दर्शनात उडी घेतली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता पुन्हा ते 'एकदा काय झालं' या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'वेडिंगचा शिनेमा' चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी या चित्रपटाचंही लेखन, दिग्दर्शन आणि संगीत या सर्वांची जबाबदारी पार पाडणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा-आयुष्मान खुराना - नुसरत भरुचाची रोमॅन्टिक केमेस्ट्री, पाहा 'ड्रीमगर्ल'चं नवं गाणं