मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या निर्मितीअंतर्गत तयार होणाऱ्या 'नोटबुक' चित्रपटातील 'मै तारे' हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गाणे सलमान खाननेच गायले आहे. काही दिवसांपूर्वीच या सलमान खानने या गाण्याचा टीजर सोशल मीडियावर शेअर कला होता.
भाईजानच्या आवाजातील 'मै तारे' गाणं प्रदर्शित! - notebook
सलमान खान प्रनुतन बेहल आणि जहिर इकबाल या नवोदित कलाकारांना घेऊन 'नोटबुक' चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाच्या 'मै तारे' या गाण्यासाठी त्याने आवाज दिला आहे.
सलमान खान प्रनुतन बेहल आणि जहिर इकबाल या नवोदित कलाकारांना घेऊन 'नोटबुक' चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाच्या 'मै तारे' या गाण्यासाठी त्याने आवाज दिला आहे. यापूर्वीही त्याने 'हँगओव्हर', 'मै हु हिरो तेरा' ही गाणी गायली आहेत. आता 'मै तारे' या गाण्यातूनही त्याने त्याच्या आवाजाची झलक दाखवून दिली आहे.
हे गाणे विशाल मिश्रा यांनी कंपोझ केले आहे. या गाण्यात प्रनुतन बेहल आणि जहिर इकबाल यांच्या रोमॅन्टिक केमेस्ट्रीसह सलमान खानच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते.
सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची लिंक शेअर करून 'देखो और प्यार मे खो जाओ', असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटातील हे चौथे गाणे आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर हे करत आहेत. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होईल.