मुंबई - 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू ही बारावीच्या परिक्षेत तब्बल ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'आर्ची' पास झाली रे..... - sairat
आर्चीला 'सैराट' चित्रपटात बारावीला ५५ 'टक्के' होते. मात्र, रिंकूने खऱ्या आयुष्यात बारावीला ८२ टक्के गुण मिळवले आहेत.
आर्चीला 'सैराट' चित्रपटात बारावीला ५५ 'टक्के' होते. मात्र, रिंकूने खऱ्या आयुष्यात बारावीला ८२ टक्के गुण मिळवले आहेत. रिंकू अलिकडेच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात तिची राजकिय भूमिका पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच तिला बारावीचा अभ्यास करावा लागला होता. अभिनय आणि अभ्यासाची सांगड घालत ती बारावीत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाली आहे.
दरम्यान रिंकू पुन्हा एकदा 'मेकअप' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अलिकडेच टीजर प्रदर्शित झाला आहे. बिनधास्त भूमिका साकारणारी रिंकू या चित्रपटातही रावडी अंदाजात पाहायला मिळणार आहे. आता तिने बारावीचा गड तर जिंकला आहे. त्यामुळे अभिनयात तिला आणखी कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.