मुंबई -बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुरचा आज तिसरा वाढदिवस आहे. तैमुरच्या जन्मापासूनच तो सोशल मीडियामध्ये लोकप्रिय आहे. बॉलिवूडच्या स्टारकीड्समध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. करिना आणि सैफने त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
तैमुरच्या वाढदिवशी अभिनेत्री सारा अली खान हिनेही त्याचे क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
करिना कपूरनेही तैमुर आणि सैफसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये कपूर कुटुंबातील बऱ्याच सदस्यांनी हजेरी लावली होती.