मुंबई -बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची चर्चा जास्त पाहायला मिळते. शाहरुखची मुलगी सुहाना असो किंवा सैफ अली खानचा मुलगा तैमुर. कारण कोणतेही असो, हे स्टारकिड्स लाईमलाईटमध्ये नक्कीच येत असतात. तैमुर तर करिना आणि सैफपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे. मात्र, यावेळी तैमुरची नाही तर, सैफचा मुलगा इब्राहिम हा लाईमलाईटमध्ये आला आहे.
तैमुर नाही, तर सैफचा मुलगा इब्राहिम आलाय चर्चेत, हे आहे कारण - सैफ अली खान
इब्राहिम खान हा सैफ अली खानची कॉपी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, तो हुबेहुब सैफसारखचा दिसतो. अलिकडेच तो मुंबईच्या एका रेस्टारंटमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यानंतर त्याच्याजवळ लहान मुलांनी गर्दी केली होती.
इब्राहिम खान हा सैफ अली खानची कॉपी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, तो हुबेहुब सैफसारखचा दिसतो. अलिकडेच तो मुंबईच्या एका रेस्टारंटमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यानंतर त्याच्याजवळ लहान मुलांनी गर्दी केली होती. यावेळी इब्राहिमने त्यांच्यासोबत फोटो काढले. सोबतच त्यांच्याशी गप्पादेखील मारल्या. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियामध्ये कौतुक होत आहे.
यावेळी त्याच्यासोबत पुजा बेदीची मुलगी आलिया एफ हिदेखील हजर होती. तिनेही आनंदाने या मुलांसोबत फोटो काढले. लवकरच ती सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.