मुंबई -सैफ अली खान एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांमुळे ओळखला जात होता. मात्र, मध्यंतरी त्याने काही गंभीर भूमिका साकारल्या. आता पुन्हा एकदा तो त्याच्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 'जवानी जानेमन'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सैफ अली खानचा पुन्हा धमाल अंदाज, पाहा 'जवानी जानेमन'चा ट्रेलर - tabu in Jawaani Jaaneman
सैफ अली खानसोबत या पूजा बेदीची मुलगी आलिया या चित्रपटातून पदार्पण करत आहे. तर, अभिनेत्री तब्बूदेखील आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये अवतरली आहे.
सैफ अली खानसोबत या पूजा बेदीची मुलगी आलिया या चित्रपटातून पदार्पण करत आहे. तर, अभिनेत्री तब्बूदेखील आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये अवतरली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो एकदम कुल अंदाजात दिसला आहे. मात्र, त्याची मुलगी आणि पत्नी आल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय गोंधळ उडतो, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
या चित्रपटात सैफ अली खानच्या 'ओले ओले' गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जनदेखील पाहायला मिळणार आहे.
नितीन कक्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी हिमेश रेशमिया आणि सोनिया मान यांचा 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.