मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान 'लाल कप्तान' या चित्रपटातून नागा साधुच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे बरेच फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातील सैफचा लूक चर्चेचा विषय बनत आहे. आता नवरात्रीच्या पर्वावर या चित्रपटातील सैफचा दशावतारी रावणाच्या रुपातील लूक शेअर करण्यात आला आहे.
'लाल कप्तान' चित्रपटात सैफचा थरारक लूक हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. मागच्या वर्षीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग यांनी केलं आहे. इरोझ इंटरनॅशनल आणि आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.