मुंबई -बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या आगामी 'लाल कप्तान'ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात तो नागा साधूच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी या चित्रपटाची काही पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली होती. सैफच्या लूकमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना उत्कंठा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सैफ अली खानचा हा एक पिरीयड ड्रामा आहे. यात त्याची भूमिका खूपच आकर्षक आहे. राख फासलेल्या चेहऱ्यावर लालभडक टीळा त्याच्या लूकचं आकर्षण वाढवतो. शिवाय त्याच्या भूमिकेविषयीही उत्सुकता निर्माण करतो. कोणी त्याला 'भोले का सिपाई' तर कोणी त्याला भूत समजतो. मात्र, नेमकी त्याची भूमिका काय हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.