मुंबई - सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पतौडी क्रिकेटच्या मैदानात नेहमी मेहनत घेत असतो. चित्रपटापासून दूर असूनही त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या त्याचा क्रिकेटची नेट प्रॅक्टीस करीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
सैफ अलीचा मुलगा इब्राहिम आहे क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर, पतौडींचा वारसा चलवणार का छोटे नवाब?
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याला आपल्या आजोबांप्रमाणे क्रिकेटर व्हायचे आहे. तो बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीही उत्तम करत असतो. त्याच्या नेट प्रॅक्टीसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत इब्राहिम बॉलचा जबरदस्त प्रहार बॅटने करतो. त्याचा हा फटका अत्यंत शास्त्रशुध्द आहे. त्याला आपल्या आजोबांप्रमाणे क्रिकेटर व्हायचे आहे. सैफ अली खानचे वडिल मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न इब्राहिम करताना दिसतोय.
इब्राहिम ऑलराऊंडर क्रिकेटर असल्याचे मसजते. तो बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीही उत्तम खेळत असतो. त्याचा या व्हिडिओवरुन ते लक्षात येते. सैफलाही तो क्रिकेटर व्हावा असेच वाटत असणार. मन्सर अली खान पतौडी यांनी सैफला क्रिकेटचे धडे दिले होते. यासाठी त्याने इंग्लंडमध्ये जाऊन प्रशिक्षणही घेतले होते. मात्र तो व्यावसायिक खेळाडू न बनता आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पोहोचला. आता इब्राहिमने क्रिकेटचा ध्यास घेतला असेल तर नवा पतौडी क्रिकेटला लाभणार का हे आगामी काळ ठरवेल.