मुंबई -सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता याच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सैफची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. लेकिची भूमिका असलेल्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर पाहुन सैफने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांना हा ट्रेलर आवडला. तर काहींनी मात्र, सैफ आणि दीपिकाचाच चित्रपट चांगला असल्याचे म्हटले. सैफने देखील या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली. मात्र, त्याची प्रतिक्रिया पाहता त्याला हा ट्रेलर फारसा रुचला नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -'लव्ह आज कल': कोण आहे कार्तिकसोबत दिसलेली आरुषी शर्मा?