महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिंहगडावरील स्वारीत सैफ अली खान बजावणार महत्त्वाची भूमिका - Maratha History

'तानाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटात सैफ अली खान महत्त्वाची भूमिका करीत आहे. यातील भूमिकेमुळे त्याच्या करियरला कलाटणी मिळू शकेल असे सांगितले जातंय.

तानाजी

By

Published : Aug 8, 2019, 4:35 PM IST


मुंबई - सैफ अली खानच्या नावावर अलिकडच्या काळात फार यशस्वी चित्रपट प्रसिद्ध झाला नाही. नेटफ्लिक्सवरच्या 'सेक्रेड गेम्स'मध्ये त्याची भूमिका दमदार होती. मात्र अशी भूमिका अलिकडच्या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली नाही.

असे असले तरी सैफ सिनेमाच्या शूटींगमध्ये खूप बिझी आहे. एका पाठोपाठ एक शूटींग तो करतोय. अशातच त्याच्या हाती एक दमदार रोल असलेला चित्रपट लागलाय. 'तानाजी - द अनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक चित्रपट तो करणार आहे. यातील त्याच्या भूमिकेमुळे त्याच्या करियरला कलाटणी मिळू शकेल असे सांगितले जातंय.

सैफ अली खान 'बाझार' या चित्रपटात झळकला होता. यात त्याने दलालाची भूमिका साकारली होती. ही भूमिका असेल किंवा 'सेक्रेड गेम्स'मधील त्याची भूमिका असेल याहून अत्यंत चॅलेंजिंग भूमिका त्याला 'तानाजी' चित्रपटात मिळाली आहे.

नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सिझन सुरू होतोय. याच्या शूटींगमध्ये सैफ गुंतला होता. दरम्यान 'जवानी जानेमन', 'भूत पोलीस' आणि 'लाल कप्तान' या चित्रपटांचेही तो शूटींग करीत होता.

'तानाजी - अनसंग वॉरियर' हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. सिंहगड किल्ल्यावर झालेल्या लढाईची कथा यात मांडली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details