मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील वातावरण गंभीर बनले आहे. सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही जाबादार असल्याचा आरोप सुशांतचे चाहते आणि समर्थकांकडून होत आहे. अनेक दिग्गज कलाकार, निर्माता, दिग्दर्शकांवर नेपोटिझ्मचा आरोप होतोय. दरम्यान अभिनेता सैफ अली खाननेही आपल्यावर नेपोटिझ्ममुळे अन्याय झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सैफला नेटिझन्सनी धारेवर धरले आहे.
सध्या सैफ अली खानवर प्रचंड टीका सुरू झाली आहे. आपल्याला माहिती आहे की, सैफ हा प्रसिध्द दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. त्यामुळेच तो टीकेचा धनी बनलाय. त्याने आपल्यावरही घराणेशाहीमुळे अन्याय झाला असे केलेले विधान नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले नाही. त्यांनी मीम्सच्या माध्यमातून आणि कडक शब्दातून त्याच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे.
एका युजरने लिहिलंय, "अजून किती खोटो बोलशील? लाज वाटत नाही का?"
एक युजर लिहितो, "आजची सर्वात मोठी मस्करी ही आहे की, सैफ अलीलाही बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला होता."