महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मिरांडा हाऊस' सिनेमाद्वारे साईंकित कामतचे सिनेसृष्टीत पदार्पण - debut

आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या भूमिकेतूनही त्याचे वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही

साईंकित कामतचे सिनेसृष्टीत पदार्पण

By

Published : Mar 28, 2019, 9:32 AM IST

मुंबई- विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साईंकित कामत आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'मिरांडा हाऊस' या चित्रपटातून साईंकित मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा रहस्यमय चित्रपट असणार हे नक्की. त्यामुळे या चित्रपटात साईंकितची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या भूमिकेतूनही त्याचे वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही. या चित्रपटात साईंकितसोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

'मिरांडा हाऊस'च्या निमित्ताने मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'अ रेनी डे', 'सावरिया.कॉम' आणि 'सावली' असे वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या राजेंद्र तलाक यांनी 'मिरांडा हाऊस'चे दिग्दर्शन केले आहे. आयरिस प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details