महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मीडियम स्पायसी' बनून सई ताम्हणकर-ललित प्रभाकर येणार एकत्र - Lalit Prabhakar in Medium Spicy film

'मीडियम स्पायसी' या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

Medium Spicy film release date out, Medium Spicy film first look, Medium Spicy film news, मीडियम स्पायसी चित्रपट, मीडियम स्पायसी चित्रपट न्यूज, Sai Tamhnakar in Medium Spicy, Lalit Prabhakar in Medium Spicy film, Parna Pethe in Medium Spicy film,
'मीडियम स्पायसी' बनून सई ताम्हणकर - ललित प्रभाकर येणार एकत्र

By

Published : Feb 10, 2020, 12:10 PM IST

Updated : Feb 10, 2020, 12:50 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी मात्र, ती 'मीडियम स्पायसी' रुपात दिसणार आहे. 'मीडियम स्पायसी' हा तिचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकरची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'मीडियम स्पायसी' या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. सई आणि ललितसोबत अभिनेत्री पर्ण पेठेचीही यामध्ये मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणाऱ्या या फोटोमूळे आता ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय.

हेही वाचा -'ती सध्या काय करते'च्या बाल अभिनेत्रीने गिरवले अभिनयाचे धडे

या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा केली आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ ५ जून २०२० ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

या फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सई, ललित आणि पर्ण यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली. आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक या फोटोतूनही प्रतीत होतेय. 'एखादा पदार्थ चविष्ट व्हायला जशी पदार्थांची योग्य प्रमाणात भट्टी जमणे गरजेचे आहे, तशीच या तीनही कलाकारांची बट्टी जमलेली तुम्हांला सिनेमा पाहताना जाणवेल. आपापल्या भूमिका स्वत:मध्ये मुरण्यासाठी सई, ललित आणि पर्णच्या मेहनतीला मोहितच्या दृष्टिकोणाचीही योग्य जोड मिळाली आहे. या सगळ्यांची एकत्रित मेजवानीच आता ५ जूनला प्रेक्षकांना मिळणार आहे'.

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “सई, ललित आणि पर्णमूळे ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची लज्जत काही औरच झाली आहे. तिघांचेही व्यक्तिमत्व, आवडी-निवडी, काम करण्याच्या पध्दती आणि उर्जा वेगवेगळ्या आहेत. पण एक रूचकर सिनेमा बनवायला, हाच वेगळेपणा सिनेमाचा समतोल राखण्यात आणि नाट्य खुलवण्यासाठी खूप परिणामकारकपणे उपयोगी पडलाय.”

सूत्रांच्या माहितीनूसार, सध्या हा सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असल्याने चित्रपट संपूर्णपणे तयार व्हायला अजून काही काळ लागणार आहे. आणि त्यानंतर उन्हाळ्यांच्या सुट्ट्या संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर रिलॅक्स मूडमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा एन्जॉय करता यावा, म्हणून सिनेमाच्या टिमने एकत्रितपणे रिलीज डेट ५ जून ठरवली आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर ह्यांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.

हेही वाचा -'राम मोहम्मद सिंग आझाद' एकांकिका सुशील करंडकाची मानकरी

Last Updated : Feb 10, 2020, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details