मुंबई -यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराचं पथक तैनात झालेत. स्थानिक नागरिकही एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशातच मराठी कलाकारांनीही पूरग्रस्तांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
'सांगली आणि कोल्हापूरकर: काळजी घ्या', मराठी कलाकारांचं राज्यातील पूरग्रस्तांना आवाहन - तेजस्विनी पंडीत
अभिनेत्री सई ताम्हणकर, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, तेजस्विनी पंडीत, रितेश देशमुख, यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्तांना तसेच स्थानिक नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
'सांगली आणि कोल्हापूरकर: काळजी घ्या', मराठी कलाकारांचं राज्यातील पूरग्रस्तांना आवाहन
अभिनेत्री सई ताम्हणकर, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, तेजस्विनी पंडीत, रितेश देशमुख, यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्तांना तसेच स्थानिक नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.