मुंबई - 'गर्लफ्रेंड'साठी नाव सुचवा असं म्हणणाऱ्या अमेय वाघने 'मी गर्लफ्रेंड पटवणारंच', अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडचा शोध संपला आहे. त्याच्या आगामी 'गर्लफ्रेंड' चित्रपटात अमेयच्या 'गर्लफ्रेंड'च्या रुपात नक्की कोण दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसुन सई ताम्हणकर आहे.
अमेयच्या 'गर्लफ्रेंड'चा शोध संपला, 'ही' असेल त्याची गर्लफ्रेंड - अनिश जोग
अमेय वाघने या चित्रपटासाठी त्याचा हटके लूक करून घेतला आहे. त्यासाठी त्याने त्याचे वजनही वाढवले आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
होय, सई ताम्हणकर अमेय वाघच्या 'गर्लफ्रेंड'ची भूमिका साकारणार आहे. सईनेच याबाबत खुलासा करत एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'हिच ती', असे कॅप्शन देऊन तिने तिचा आणि अमेयचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात तिचे नाव 'अलिशा' असे असणार आहे. पहिल्यांदाच हे दोघे एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. सईने आजवर अनेक सुपरहिट मराठी चित्रपट साकारले आहेत. तिच्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर आहे.
अमेय वाघने या चित्रपटासाठी त्याचा हटके लूक करून घेतला आहे. त्यासाठी त्याने त्याचे वजनही वाढवले आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. तर, रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची निर्मिती आहे. आता सई आणि अमेयची जोडी प्रेक्षकांवर कसा प्रभाव पाडते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.