मुंबई -मेट्रोच्या कारशेडसाठी 'आरे' परिसरातील हजारो झाडी रात्रभरात कापण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींसह कलाविश्वातील कलाकारांनीही विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने ट्विटरच्या माध्यमातून 'आरे'तील वृक्षतोडीवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला.
‘कापा. सगळी झाडं कापा. नंतर बसा बोंबलंत. जेवढी झाडं कापतायत तेवढीच परंत लावणार का?’ अशा शब्दांत सईने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
वृक्षतोडीच्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींमध्येच नाही तर सामान्य नागरिकांमध्येही संताप उमटत आहे.