महाराष्ट्र

maharashtra

सई ताम्हणकर बनतेय न्यू एज मराठी सिनेमाचा चेहरा

By

Published : Jul 29, 2019, 12:40 PM IST

सई ताम्हणकर पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोणामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यू एज सिनेमाचा चेहरा आहे.

सई ताम्हणकर


अभिनेत्री सई ताम्हणकरला नाविन्याची सातत्याने ओढ असते, हे तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असे, एक्पिरिमेन्ट करताना दिसत असताना, सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देतेय. आणि याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर.

सई ताम्हणकर

यंदा दोन फस्ट टाइम फिल्ममेकर्ससोबत मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री असलेल्या सईचे सिनेमे येत आहेत. गर्लफ्रेंड सिनेमातून सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये आणि मिडीयम स्पाईसी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत सई ताम्हणकर पहिल्यांदाच सिनेमा करत नाही आहे. या अगोदरही सईने मनवा नाईक (पोर बाजार), हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर), गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब), दिपक भागवत (3.56 किल्लारी), ज्ञानेश झोटिंग (राक्षस), अशा फस्ट-टाइम दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केले आहे.

सई ताम्हणकर

सईच्या जवळच्या सूत्रांनुसार, आपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वत: पहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोनामुळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यू एज सिनेमाचा चेहरा आहे.

सई ताम्हणकर

सई याविषयी म्हणते, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोण आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवतानाच्या नव्या दिग्दर्शकांच्या अप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते. स्वत:ला ‘ऑन टोज’ ठेवण्यासाठीची ही एक्टर म्हणून माझी एक्सरसाइज असते. भारतीय सिनेमा पूढे जायला हवा असेल, आणि एक्टर म्हणून प्रगल्भ व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं. “

ABOUT THE AUTHOR

...view details