महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांचा वर्षाऋतू होणार 'कलरफुल'! - Prakash Kunte latest news

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कलरफुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यंत्रा पिक्चर्स, शकुल शोबिझ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने २ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा सिनेमा नक्कीच सर्वाना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही.

'colorful
'कलरफुल'!

By

Published : Feb 10, 2021, 1:07 PM IST

मुंबई - गेल्या वर्षातील सर्वच ऋतू भीती आणि एकटेपणात गेले. कोरोना संक्रमणामुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी रसिकांना चित्रपटगृहांपासून लांब राहावे लागले. कोरोनाचा बसलेला विळखा जसजसा सुटू लागला तसतसा लोकांनी आयुष्य पूर्ववत आणण्याचा प्रयत्न सुरु केला. मनोरंजनसृष्टीतही सध्या उत्साहाचे वातावरण आहे कारण नवीन प्रोजेक्ट्स सुरु झालेत व चित्रपटगृहे सुरु झाल्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्गही खुला झालाय. बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनांच्या तारखा घोषित होत आहेत. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कलरफुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नुकतीच घोषित करण्यात आली.

'कलरफुल' पोस्टर
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे नवीन पोस्टर या प्रेमाच्या महिन्यात अतिशय सुखद अनुभव देणाऱ्या प्रेमाचे नवीन रंग उधळणारे आहे. अतिशय सुंदर, रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत आहे. प्रेमाने ओतप्रोत असलेले त्याचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेले फुल हे या पोस्टरवर लक्षवेधक ठरत आहे. अतिशय रंगीत व रंगीन विषयावरील असणारा हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित ह्या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. मानसी या मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत असून हा सिनेमा मानसी यांच्या यंत्रा पिक्चर्स आणि मुन्ना शकुल यांच्या शकुल शोबिझ या दोन्ही बॅनरच्या सहयोगाने सादर होणार आहे. यानिमित्ताने यंत्रा पिक्चर्स बॅनरच्या मानसी सांगतात, " मला यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ यांच्या एकत्रीकरणामुळे खूप आनंद होत आहे. आता आम्ही मिळून लवकरच हिंदी, मराठी आणि गुजराती सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. आमची मराठी चित्रपटांची सुरुवात 'कलरफुल' सिनेमाने होत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. यंत्रा पिक्चर्स, शकुल शोबिझ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने २ जुलैला प्रदर्शित होणारा हा सिनेमा नक्कीच सर्वाना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही.यावर्षी यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ मराठीसह गुजराती चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.”वर्षाऋतू मध्ये प्रेमाच्या पावसाने चिंब भिजवायला, सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला, प्रकाश कुंटे दिग्दर्शित, ‘कलरफुल’ हा चित्रपट येत्या २ जुलैला प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा - 'हे' आहे जॅकलिन फर्नांडिजच्या फिटनेसचे रहस्य

ABOUT THE AUTHOR

...view details